अभंगवर्षा
मराठी व हिंदी संतरचनांचे संगीत देऊन हेमंत पेंडसे यांनी अभंगवर्षा या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. या कार्यक्रमामध्ये संत सूरदास, संत तुलसीदास, संत मीराबाई, संत कबीर, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत नामदेव, संत चोखामेळा, संत सोयराबाई अशा अनेक संतरचना सादर केल्या जातात.
पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या संस्कारात वाढलेल्या हेमंत पेंडसे यांच्या रचनांवर अभिषेकीबुवांचे संस्कार जाणवतातच. यामध्ये आपल्या गुरूंचे स्मरण यानिमित्ताने व्हावे यासाठी श्री.हेमंत पेंडसे हे अभिषेकीबुवांनी संगीतबद्ध केलेल्या काही रचना सादर करतात.
या कार्यक्रमाचा कालावधी साधारणपणे अडीच तासांचा असून यामध्ये वेळप्रसंगी सहगायक कलाकार यांचा देखील समावेश असतो.
तबला, हार्मोनियम,तालवाद्य, पखवाज यांची साथसंगत या कार्यक्रमामध्ये असते.
या कार्यक्रमासाठी संपर्क
हेमंत पेंडसे
मोबाईल नं : ९४२२३३६५३६( 9422336536)
८८०५०२६५३६ (8805026536)
इ -मेल - pendsehemant@gmail.com
|