मनहर संगीत सभा निर्मित
एक राधा एक मीरा ....
संत मीराबाई आणि डॉक्टर राहुल देशपांडे यांच्या काव्यावर आधारित संगीतमय कार्यक्रम
अव्यक्त राधेच्या कृष्णाचा आणि मीराबाईंच्या कृष्ण अनुभूतीचा शोध घेण्याचा आमचा हा आगळा वेगळा प्रयत्न.
पं.अभिषेकीबुवांचे शिष्य श्री. हेमंत पेंडसे यांनी दिलेले रसाळ चालींचे संगीत, संत मीराबाईंच्या ऊत्तुंग शब्दरचना आणि डॉक्टर राहूल देशपांडे यांच्या अव्यक्त राधेचा शोध घेणाऱ्या आगळ्या वेगळ्या भावरचना , एकुणच ऊर्जेचे संगीतामधून व्यक्त होणे हा कार्यक्रमाचा उद्देश. त्यामुळे इथं भावगीत फुलून येते, भक्तीगीत तर मनामनात घर करून राहते आणि अगदी इथे गौळणही बहरते.
एकूण काय मानवी स्वभावातील सर्व भावनांची स्पंदने अगदी कवी मनातून कवितेद्वारे पण गहिरा रंग भरून जाते.संगीताचे संस्कार काय सांगतात, हे देखील श्री. हेमंत पेंडसे यांचे कडून ऐकायला मिळते. यामध्ये त्यांचे गुरु पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या काही रचना देखील ऐकायला अनुभवायला मिळतात.
म्हणूनच जशी शास्त्रीय, भाव, नाट्य, सुगम, भक्ती अशी सीमारेषा च राहत नाही ....!तशी कवी संगीतकार गायक कलाकार वादक कलाकार आणि श्रोते यात देखील ती राहत नाही.
म्हणूनच भैरवीकडे जाताना डॉ.राहुल देशपांडे यांचे शब्द यथार्थ वाटतात.
मनावर गोंदलेले सावळे काहूर !
एक झाला सारा रंग एक लय सूर !
भारतामध्ये होत असलेल्या या कार्यक्रमाचा नुकताच रौप्य महोत्सवी म्हणजे २५ वा प्रयोग झाला. लोकांनी आणि लोकप्रिय कलाकारांनी देखील याची प्रशंसा केली आहे.
श्रीमती विद्याताई अभिषेकी, राहुल सोलापूरकर यांच्याबरोबरच पं.सुहास व्यास, डॉ.विकास कशाळकर, विदुषी पद्माताई तळवलकर, पं.शौनक अभिषेकी, या सारख्या शास्त्रीय संगीतामधील विद्वानांनी व तरुण कलाकारांमधील महेश काळे, अवधूत गुप्ते, डॉ.सलील कुलकर्णी या लोकप्रिय कलाकारांच्या प्रतिक्रियांचे व्हिडीओज देखील आपण या सोबत बघू शकता.
या कार्यक्रमध्ये एकूण तीन गायक कलाकार असतात
१ हेमंत पेंडसे
(या संपूर्ण कार्यक्रमातील रचनांचे चे संगीतकार व प्रमुख गायक )
२ प्रज्ञा देशपांडे
३ राधिका ताम्हनकर .
बासरी, तबला, हार्मोनियम, पखवाज, टाळ व निवेदक असे या कार्यक्रमात खालीलप्रमाणे सहा साथसंगत व निवेदकासह मिळून एकूण नऊ कलाकार आहेत.
|